शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (13:36 IST)

सरकारी योजनांसाठी सढळ हस्ते निधी

काळजीवाहून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हंगामी अर्थसंकल्पात करप्रस्तावांना हात न लावता सरकारची ओळख असलेल्या योजनांना भरभरून निधी दिला आहे. रोजगार हमी योजनेसह अनेक योजनांसाठी तब्बल ३० हजार १०० कोटी रूपये दिले आहेत.

२००८ ते ०९ च्या अर्थसंकल्पात करातून मिळणारे उत्पन्न ६ लाख ८७ हजार ७१५ कोटी रूपये मिळणार होते. पण आता सुधारीत आकडेवारीनुसार ते ६ लाख २७ हजार ९४९ कोटींपर्यंत खाली आणण्यात आले आहे. असे असूनही मुखर्जी यांनी करांना हात लावलेला नाही. अर्थात, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

याशिवाय सरकारने सुरू केलल्या अनेक योजनांसाठी सढळ हस्ते पैसा देण्यात आला आहे. या विविध योजनांसाठी ९ लाख ५३ हजार २३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईवरील हल्ल्यानंतर संरक्षण हा मुद्दा मह्त्वाचा ठरल्याने संरक्षणावरची तरतूद १ लाख ४१ हजार ७०३ कोटींपर्यंत नेली आहे.