Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (15:05 IST)
अणू उर्जेसाठी ३२४५ कोटी रूपये
अणू करार मार्गी लावणार्या 'युपीए' सरकारने अणू उर्जेसाठी बजेटमध्ये तरतूद केली नसती तरच नवल. सरकारने अणू उर्जेसाठी ३२४५.७२ कोटींची तरतूद केली आहे.
अणू उर्जा आयोजन परिव्ययासाठी १५२८.७२ कोटी आणि आयईबीआरसाठी १७१७ कोटी रूपये अशी या तरतुदीची फोड आहे. रशियाच्या सहाय्याने कुडनकुलम येथील अणू प्रकल्पासाठी ६०३.६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाभा अणू संशोधन केंद्र व इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्राच्या प्रकल्पांसाठीही यात निधी देण्यात आला आहे.