शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वेबदुनिया|

बजेटनंतर सेन्‍सेक्समध्‍ये मोठी घसरण

शेअर खरेदी व विक्रीवरील टॅक्स तसेच ठेवण्‍यात आल्‍याने आणि उद्योगधंद्यांना चालना देण्‍यासाठी कोणत्याही प्रोत्‍साहन पॅकेजची घोषणा न केल्‍याने सर्वसामान्‍यांसह उद्योजकांचीही निराशा करणा-या हंगामी अर्थसंकल्‍पामुळे शेअर बाजारात सुमारे 200 अंशांची घसरण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्‍या तोंडावर आणि मंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर सादर होणा-या या बजेटमधून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झालेल्‍या नाहीत. तर गृहकर्जावरील करही जसेच्या तसे ठेण्‍यात आले आहेत. अर्थात भारत निर्माण योजनेसाठी केलेली 40 हजार कोटींची भरघोस तरतुद आणि सुरक्षा व्‍यवस्‍थेवरील खर्चात वाढ करण्‍याचा निर्णय झाला आहे.