1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:39 IST)

राज्यात 5,424 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

महाराष्ट्रात कोरोनाचा  प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 5 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मंगळवारी घट झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे.एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत आहे.

राज्यात मंगळवारी 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.तर 5, 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.87 टक्के आहे. तसेच 116 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.राज्यात आजपर्यंत 1 लाख 35 हजार 255 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 12 लाख 91 हजार 383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 01 हजार 213 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या 3 लाख 53 हजार 807 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,233 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.