कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘कोविड-केअर सेंटर’ सुरू करण्यास मान्यता

bed
Last Modified बुधवार, 28 एप्रिल 2021 (21:00 IST)

राज्यात
कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी
रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी
देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले असून रुपये १० लाखाच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक, यांना देण्यात आले आहेत.
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून Oxygen Concentrator तथा Oxygen Cylinder, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नास्ता व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी.
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील असेही श्री.पाटील यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर ...

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा
मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी त्वरित चुकवावी लागणार : वित्त मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडियाची थकबाकी ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क अधिकार Lee Cooperसाठी विकत घेतले
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार यांच्यासोबत भागीदारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च ...