कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला

Last Modified सोमवार, 19 एप्रिल 2021 (08:14 IST)
राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र रविवारी कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. राज्यामध्ये रविवारी तब्बल 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये सर्वाधिक 88 जणांचा तर मुंबईमध्ये 53 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८ टक्के एवढा आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यामध्ये कोरोना रुग्णांना खाटा, आयसीयू, ऑक्सिजन खाटा मिळणे अवघड झाले आहे. त्यातच रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दररोज नवनवीन विक्रम होत असताना रविवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने 500 चा आकडा ओलांडत राज्याला धक्का दिला आहे. राज्यामध्ये रविवारी झालेल्या 503 मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू अहमदनगरमध्ये 88 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये 53, पुणे 45, जळगाव 40, नागपूर 27, नांदेड 24, नंदूरबार 19, लातूर 19 यांचा समावेश आहे. अहमदनगरमधील परिस्थिती बिकट होत असून, काही दिवसांपासून सातत्याने नगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याचबरोबर नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले असून, नागपूरमधील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. तर मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मृतांची संख्या 50 च्या आसपास कायम राहिली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत होत असलेली वाढ राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडणार आहे. नोंद झालेल्या एकूण ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६५ मृत्यू, अहमदनगर ४५, जळगाव ३२, पुणे ३१, नागपूर ११, ठाणे ९, यवतमाळ ८, परभणी ६, नांदेड ५, नंदूरबार ४, औरंगाबाद ३, भंडारा २, नाशिक २ रायगड २, अकोला १, लातूर १ उस्मानाबाद १, सांगली १ आणि सोलापूर १ असे आहेत.
राज्यामध्ये रविवारी ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधितांची संख्या ३८,३९,३३८ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,७०,३८८ इतकी आहे. रविवारी ४५,६५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर राज्यात आतापर्यंत ३१,०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९२ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी

राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी
मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृतांची ...

लसीच्या दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या-केंद्र सरकार

लसीच्या दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या-केंद्र सरकार
नवी दिल्ली- कोविड -19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना राज्य सरकारने प्राधान्य देण्याचे आवाहन ...

शिष्यवृत्ती चाचणी 2021 ; पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती ...

शिष्यवृत्ती चाचणी 2021 ; पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, एमएससीईने ...

कोरोना आहार : 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक ...

कोरोना आहार : 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक क्षमता
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचं आहे. ...

उद्धव ठाकरे: 'मराठा आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधानांची भेट ...

उद्धव ठाकरे: 'मराठा आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार'
"मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळायला हवा. आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन विनंती करणार ...