मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (08:01 IST)

नागपूरमध्ये दोन दिवसांचा जनता कर्फ्यूची घोषणा

नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
 
येत्या शनिवार-रविवारी आणि पुढल्या आठवड्यात जनता कर्फ्यूचं नागरिकांना महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केलं आहे. नागपूर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 8 दिवसांतच नागपुरात कोरोनाचे 13608 नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे, 8 सप्टेंबरला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 37 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. कोरोना चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. ते मार्च महिन्याच्या तुलनेत 10 पटीन तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढलं आहे.