क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये

नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 1 एप्रिल 2020 (12:57 IST)
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील घरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. 23 मार्चला स्मृती मुंबईवरुन सांगलीला परतली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिला होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देणत आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर तिच्या तब्बेतीकडे

लक्ष ठेवून आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत
सांगली जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत परदेशातून आलेल्या सुमारे 200 लोकांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मृती ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकात सहभागी झाली होती. ही स्पर्धा संपल्यानंतर ती मुंबईत आली. जगभरासह भारतात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाल्यानंतरही स्मृती मुंबईतल्या घरी होती. यानंतर 23 मार्चला ती सांगलीतल्या आपल्या घरी आली.

महापालिकेच्या अधिकार्‍यांना 25 मार्चला ही माहिती समजताच त्यांनी तिला क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिल्याचे सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितलं.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकलले आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणे योग्य नसल्याचे मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केले होते.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

नागरीकांनी दोन दिवस घरातच सुरक्षित थांबा

नागरीकांनी दोन दिवस घरातच सुरक्षित थांबा
निसर्ग चक्रीवादळ आज अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून व ...

भारत प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार

भारत प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार
कोरोनापासून केवळ मानवाचा नाही तर प्राण्यांचाही बचाव करण्याची गरज आहे. त्यामुळेच आता ...

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले
राज्यात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना ...

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने ३ जून रोजी मुंबईहून ...