बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 16 एप्रिल 2020 (15:31 IST)

...तर वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईलः आंबेडकर

शासनाकडे अन्नधानचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा वांद्रे येथे उद्रेक झाला. शासनाने आता तरी जागे व्हावे. शासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत तर त्याचा उद्रेक देशभर होईल; असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्‍येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉकडाउनला विरोध केला.

लॉकडाउन वाढवल्याने आपल्यावर उपासारीची वेळ येईल, अशी भीती या कागारांना वाटली आणि त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जाव पांगविला, असं सांगतानाच शासनाकडे अन्नधानचा प्रचंड साठा असल्याने सरकारने हातावर पोट असलेल्यांना महिनचे धान्य मोफत वाटावे, अशी आम्ही विनंती केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वांद्रे येथे मजुरांचा उद्रेक झाला, असा दावा आंबेडकरांनी केला आहे.
कृती करण्याऐवजी 21 दिवसांमध्ये कोरोना कसा थांबवला याचंच गुणगान करण्यात सरकार मश्गुल आहे. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना कायम सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही, असेही आंबेडकर म्हणाले.