शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (22:22 IST)

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना

अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लकी ड्रॉ योजना आणली आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे ते या योजनेसाठी पात्र ठरतील आणि विजेत्याला 60,000 रुपयांचा स्मार्टफोन दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन(एएमसी) ने म्हटले आहे की 1 ते 7 डिसेंबर दरम्यान अँटी कोव्हीड -19 लसींचा दुसरा डोस घेणारे लोक या योजनेसाठी पात्र ठरतील. आणि एका विजेत्यांचे नाव नंतर लकी ड्रॉ मध्ये काढण्यात येतील. 
गुजरातमधील नगरपालिका संस्था लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवीन योजना आणतात जेणे करून 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करता येईल.
एएमसी ने या पूर्वी हजारो लाभार्थी विशेषतः शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना एक लिटर खाद्यतेलाची पाकिटे वितरित केली होती. 
एएमसी ने आरोग्य विभागाला सांगितले की, आता पर्यंत शहरातील 78 .7लाख लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत. त्यापैकी 47.7 लाख लोकांनी पहिला डोस घेतले आहे. तर 31 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे 
एएमसी ने म्हटले आहे की , ज्या लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही किंवा एकही  डोस घेतला  नाही त्यांना उद्याने, प्राणी संग्रहालय, संग्रहालये आणि खाजगी आणि व्यावसायिक भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल