सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

31 मार्च रोजी पापमोचनी एकादशी, सर्व पाप नाश करणारी एकादशी

फाल्गुन महिन्यात येणार्‍या एकादशीला पापमोचनी स्मार्त एकादशी म्हणतात. या वर्षी 31 मार्च, 2019, रविवार एकादशी येत आहे. ही एकादशी सर्व प्रकाराच्या पापांपासून मुक्ती देण्यात मदत करते.
 
हे एकादशी व्रत केल्याने मनुष्य विष्णू पदाला प्राप्त करून त्याचे सर्व क्लेश समाप्त होऊन त्याच्या निर्मल मनात श्रीहरी वास करतात. एकादशी व्रत सर्व महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण दोन्ही पक्षांमध्ये केलं जातं. दोघांचे फल 
 
समान आहे. मात्र पापमोचनी एकादशी व्रत केल्याने सर्व प्रकाराचे कष्ट दूर होतात आणि मोक्ष प्राप्तीची शक्यता वाढते.
 
ज्या प्रकारे महादेव आणि विष्णू दोन आराध्य आहे त्याच प्रकारे कृष्ण आणि शुक्ल दोन्ही पक्षात एकादशी उपोष्य आहे. विशेषता ही आहे की पुत्रवान्‌ गृहस्थ शुक्ल एकादशी आणि वानप्रस्थ व विधवा दोन्हीचे व्रत केल्यास उत्तम 
 
ठरतं. यात शैव आणि वैष्णव भेद देखील आवश्यक नाही कारण जीवमात्राला समान समजणारे, निजाचारमध्ये रत राहणारे आणि आपलं प्रत्येक कार्यात विष्णू आणि महादेवाला अर्पण करणारे शैव आणि वैष्णव असतात. तर दोघांचे 
 
श्रेष्ठ वागणूक एक असल्याने शैव आणि वैष्णव यांच्यात आपोआप अभेद होतं.
 
या सर्वोत्कृष्ट प्रभावामुळे शास्त्रांमध्ये एकादशीला अधिक महत्त्व दिले गेले आहे. शुद्धा आणि विद्धा- हे दोन भेद आहे. दशमी आदिहून विद्ध असलेलं विद्धा आणि अविद्ध असले तर तर शुद्धा असते. हे व्रत शैव, वैष्णव सर्व करतात. 
 
या विषयात सगळ्याचे वेगळे मत आहे. त्यांना शैव, वैष्णव आणि सौर पृथक-पृथक ग्रहण करतात. सिद्धांत रूपाने उदयव्यापिनी घेतली जाते.
 
कशा प्रकारे करावे पूजन आणि उद्यापन :- शास्त्रांप्रमाणे एकादशीचा उपास वयाच्या 80 वर्षापर्यंत करत राहावा. परंतू असमर्थ असल्यास उद्यापन करावे ज्यात सर्वतोभद्र मंडळावर सुवर्णादि कलश स्थापन करून त्यावर प्रभूची 
 
स्वर्णमयी मूर्तीची शास्त्रोक्त विधीने पूजा करावी. तूप, तीळ, खीर आणि मेव्याने हवन करावे.
 
दुसर्‍या दिवशी द्वादशीला सकाळी गो दान, अन्न दान, शय्या दान, भूयसी इतर देऊन ब्राह्मण भोजन करवून स्वत: भोजन करावे. ब्राह्मण भोजनासाठी 26 द्विज दंपतींना सात्त्विक पदार्थांचे भोजन करवून सुपूजित आणि 
 
वस्त्रादीने भूषित 26 कलश द्यावे.
 
तसेच पापमोचनी एकादशी बद्दल सांगायचे तर च्यवन ऋषींच्या उत्कृष्ट तपस्वी पुत्र मेधावी यांनी मंजुघोषासह संसर्गाने आपले संपूर्ण तप, तेज गमावले होते परंतू वडिलांनी त्याच्याकडून एकादशी व्रत करवले. तेव्हा त्याच्या प्रभावाने 
 
मेधावीचे सर्व पाप नष्ट झाले आणि ते पूर्वीप्रमाणे आपल्या धर्म-कर्म, सदनुष्ठान आणि तपस्येमध्ये संलग्न झाले. अशी पवित्रता पूर्ण आहे पापमोचनी एकादशी.
 
या व्रतामुळे जगातील प्रत्येक मनुष्याचे पाप दूर होऊन त्याला पुण्‍यफळाची प्राप्ती होते. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या सुविधा आणि सामर्थ्यानुसार एकादशी व्रत नियमाने पाळून निरंतर श्रीहरीच्या ध्यानात मग्न राहावे.