शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 वर्ष चार भागात विभाजित केले आहे. 25-25 वर्षात विभाजित या चार भागांना चार आश्रमात वाटले आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास.
 
बाल्य आणि किशोरावस्थामध्ये व्यक्ती गुरुकुलमध्ये दीक्षा ग्रहण करून शिक्षा अर्जित करायचा. यौवनामध्ये तो गृहस्थ आश्रमाचे कर्तव्य निवर्हन करायचा. प्रौढावस्थेत तो भौतिक वस्तू आणि व्यक्तींचा मोह त्यागून आपले जीवन समाज आणि धर्माप्रती समर्पित करायचा. वानप्रस्थ अर्थातच घरात राहूनच ब्रह्मचर्य व्रत पाळणे, संयम ठेवणे, मुलांना शिक्षण देणे, आणि हळू-हळू आपली जबाबदारी मुलांना सोपवून बाहेर निघून जाणे. आणि शेवटी वृद्धावस्थेत संन्यस्त होऊन सर्व त्याग करून संन्यासीप्रमाणे जगणे.
 
यात सर्वात पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, ज्याला साधारणपणे वयाच्या पहिले 25 वर्षापर्यंत मानले आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्रह्मचर्य याचा पहिला अर्थ संभोगच्या शक्तीचे संचय. दुसरा अर्थ शिक्षा आणि भक्तीचे संचय आणि तिसरा अर्थ ब्रह्माच्या मार्गावर चालणे. अर्थात केवळ संचय आणि संचय करणे, काहीही खर्च न करणे.
 
हिंदू धर्मानुसार जन्मापासून वयाच्या 7 वर्षापर्यंत व्यक्ती आपल्या आई-वडिलाजवळ राहतो नंतर विद्याआरंभ संस्कार पार पडतं. या दरम्यान तो 25 वर्षापर्यंत एखाद्या श्रेष्ठ गुरुच्या आश्रमात राहून शिक्षा, विद्या आणि भक्तीचा अभ्यास करतो.
 
वरील सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्य पालन केल्याने वीर्य, शिक्षा, विद्या आणि भक्तीचा संचय होतो. या संचयामुळे व्यक्ती गृहस्थ जीवन पुष्ट आणि यशस्वी बनवतो. म्हणूनच वयाच्या 25 वर्षापर्यंत व्यक्तीला आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवायला हवी कारण यादरम्यानच योग्य विकास होतो.
 
व्यक्तीच्या शरीरात अधिकश्या बदल आणि विकास वयाच्या 25 वर्षापर्यंत होऊन जातो. जर यादरम्यान व्यक्तीने आपली शक्ती बरबाद केली तर त्याचा गृहस्थ जीवनाला अनेक प्रकाराच्या रोग आणि शोकाला सामोरा जावं लागतं.
 
चिकित्सा विज्ञानाप्रमाणे वयाच्या 25 वर्षापर्यंत शरीरात वीर्य आणि रक्तकणांचा विकास जलद गतीने होतो, त्यादरम्यान याला शरीरात संचित करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. याने शरीर निरोगी राहतं. वयाच्या 25 वर्षापूर्वी ब्रह्मचर्य मोडल्याने वेळेपूर्वी म्हातारापण येतं आणि नपुंसकत्व किंवा संतान उत्पत्तीमध्ये समस्या येते. याने मानसिक विकास, शिक्षा, करिअर इत्यादीमध्ये व्यत्यय येतात.
 
आपल्या देशात जोपर्यंत आश्रम परंपरा चालली तोपर्यंत यश, श्री आणि सौभाग्यात हा देश सर्व शिरोमणी बनून राहिला. पण आता त्याचे पतन होत आहे.