गिरनार म्हणजेच गिरी नारायण

girnar datta temple
Last Updated: गुरूवार, 7 जुलै 2022 (07:33 IST)
दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते. १०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहतो. पहिल्यांदा जाणारे भाविक "नंतर मी परत येणार नाही हो" असेच म्हणताना दिसतात.

पण गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. मग दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात.

जर आपण गुजरात प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केला तर बहुतांश प्रदेश हा सपाट आणि मैदानी आढळून येतो, मग जुनागढ लागले की गिरनारची भव्यता खरोखरच लक्ष वेधून घेते. बाकीचा सर्व प्रदेश मैदानी म्हणल्यावर मधेच एवढा मोठा पर्वत आला कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. हे काम नक्कीच नैसर्गिक नाही तर एक दैवी रहस्य आहे हे जाणकार ओळखून आहेत.

गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासेल, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध आहे. म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे.

थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, असे मला वाटते. पहिल्या ७५०० पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो.
खरे आहे कारण आपले कर्मबंध, इच्छा आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात, आता मूलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो?

मग मनोधैर्य वाढविण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, त्याशिवाय तरणोपाय नाही.अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गिर्यारोकांनासुद्धा ५०० पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. आहे का नाही मजेदार अनुभूती !
गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात. कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते , तिथली प्रभावळच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात. उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी अश्या दत्त महाराजांचे दर्शन होते. मग "दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान" हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.

अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक, मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहिल काय ?
म्हणूनच तिथे बुद्धी कुंठीत होते. हे स्वाभाविक आहे. खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बर का !! पण खरे सांगू का तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते, काहीच सुचत नाही.
मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले. मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते. महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्या प्रमाणे " तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणिता न दुजा त्राता." हे प्रभो आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो.

साभार - सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Raksha Bandhan : यजमानाचे रक्षाबंधन

Raksha Bandhan : यजमानाचे रक्षाबंधन
रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या ...

Raksha Bandhan : असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे

Raksha Bandhan : असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे
असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे, एकमेकां विषयी च्या कळकळीचे, नको असूया असावं प्रेमच ...

गुरुवारची आरती.. निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा..

गुरुवारची आरती.. निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा..
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥

Raksha Bandhan 2022 Date नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी सण 11 ...

Raksha Bandhan 2022 Date नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी सण 11 ऑगस्टलाच साजरा केला जाणार
Raksha bandhan 2022 श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 गुरुवारी पाळावी की नाही? या विषयावर ...

श्री दत्ताची आरती

श्री दत्ताची आरती
दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥ हीं नामें जे जपती त्यांसी ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...