शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चुकीचं आहे देवाला अर्पित प्रसाद खरेदी करणे किंवा विकणे, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

आमच्या सनातन धर्मात देवाच्या प्रसादाचे अत्यंत महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला परमात्म्याचा प्रसाद ग्रहण केल्यानंतरच भोजन केले पाहिजे. म्हणून संतजन, वैष्णवजन खाद्य पदार्थ ग्रहण करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवतात नंतर प्रसाद रूपात ते ग्रहण करतात.
 
स्कंद पुराण इतर शास्त्रात आम्हाला प्रसादाच्या महत्त्वा बद्दल विस्तृत वर्णन मिळतं. शास्त्रानुसार प्रभूचा प्रसाद परम पवित्र असतो. हे ग्रहण करणारा देखील पवित्र होऊन जातो. देवाचं प्रसाद ग्रहण करणे आणि वितरण करणे यात जातीचं बंधन नसतं अर्थात प्रसाद सर्व समान रूपाने ग्रहण करू शकतात. देवाचा प्रसाद कधीही अशुद्ध किंवा शिळा नसतो आणि कोणाच्या स्पर्शाने अपवित्र होतं नाही. देवाचा प्रसाद प्रत्येक परिस्थितीत गंगा जल समान शुद्ध मानला गेला आहे.
 
काय प्रसाद खरीदणे किंवा विकणे योग्य आहे?
वर्तमान काळात हळू-हळू आमचे आराध्य स्थल देखील व्यापारिक क्रियाकलापाचे केंद्र होत आहे. आज अनेक तीर्थस्थान व आराध्य स्थली शस्त्राविरुद्ध क्रियाकलाप होऊ लागले आहे, मग ते शीघ्र दर्शन साठी उत्कोच (अधार्मिक पद्धतीने घेतलेले धन) देणं-घेणं असो वा देवाला अर्पित प्रसादाचा खरेदी-विक्रय असो.
 
हल्ली अनेक धार्मिक स्थळांवर सूचना पट दिसतात ज्यात देवाला अर्पित नैवेद्य (प्रसाद) विकलं जातं. भक्त देखील देवाचा प्रसाद खरेदी करून स्वत:ला धन्य समजतात. परंतू आपल्याला माहीत आहे का असे करणे शास्त्राविरुद्ध आहे. शास्त्रांमध्ये देवाचा प्रसाद खरेदी करणे अथवा विकणे निषिद्ध मानले गेले आहे.
 
स्कंद पुराणानुसार जी व्यक्ती देवाला अर्पित नैवेद्य, जे नैवेद्य दाखवल्यावर प्रसाद रूपात परिवर्तित होतं, ते खरेदी करतात किंवा विकतात ती दोन्ही नरकगामी असतात. येथे लक्षात घेण्यासारखे विशेष म्हणजे देवाला अर्पित करण्यासाठी नैवेद्य खरेदी करता येऊ शकतो परंतू अर्पित केल्यानंतर प्रसाद रुपी नैवेद्य खरेदी अथवा विक्रय करणे योग्य नाही.
 
तसं तर शक्य असल्यास, पूर्ण पवित्रतेसह स्वत: तयार केलेले पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवावा. देवाचा प्रसाद खरेदी-विक्रय करणे सर्वथा शस्त्राविरुद्ध आहे, म्हणून भक्तांनी असे कर्म करणे टाळावे.