1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (16:46 IST)

युधिष्ठिरने कोणत्या अटीवर द्रौपदीसोबत जुगार खेळला?

draupadi cheer haran
Mahabharat Juagar: महाभारताच्या युद्धाची मुख्य सुरुवात जुगाराच्या खेळाने होते. दुर्योधनाच्या मनात निर्माण होत असलेल्या या सूडाच्या भावनेला शकुनीने वाट करून दिली आणि याचाच फायदा घेऊन त्याने फासे खेळण्याची योजना आखली. त्याने आपली योजना दुर्योधनाला सांगितली आणि सांगितले की या खेळात त्याचा पराभव करून तू बदला घेऊ शकतोस.
 
एका खेळाद्वारे पांडवांचा पराभव करण्यासाठी शकुनीने सर्व पांडुपुत्रांना खेळण्यासाठी प्रेमाने आमंत्रित केले आणि त्यानंतर दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यात फासे फेकण्याचा खेळ सुरू झाला. शकुनी पायाने लंगडा होता, पण जुगार खेळण्यात तो अत्यंत निपुण होता. फासेवरील त्याचे प्रभुत्व असे होते की त्याला हवे ते अंक फासेवर दिसू लागायचे. एकप्रकारे त्याने हे सिद्ध केले होते की फासेचे आकडे त्याच्या बोटांच्या हालचालीने आधीच ठरलेले असयाचे.
 
खेळाच्या सुरुवातीला पांडवांचा उत्साह वाढवण्यासाठी शकुनीने दुर्योधनाला पहिले काही डाव युधिष्ठिरला जिंकू देण्यास सांगितले जेणेकरून पांडवांना खेळासाठी उत्साह मिळू शकेल. हळूहळू खेळाच्या उत्साहात युधिष्ठिरने आपली सर्व संपत्ती आणि साम्राज्य जुगारात गमावले. यानंतर युधिष्ठिराने नकुल आणि सहदेवला पणाला लावले, मग अर्जुन आणि शेवटी त्याने भीमाला गमावले.
 
शेवटी कर्णाच्या सल्ल्यानुसार, शकुनीने बाकीच्या पांडव भावांसह युधिष्ठिरला सर्व काही परत करण्याचे वचन दिले मात्र त्यांची पत्नी द्रौपदीचा पणाला लावण्यास सांगितले. युधिष्ठिरला शकुनीचा सल्ला मानणे भाग पडले आणि शेवटी तो हा डावही हरला. या खेळात पांडव आणि द्रौपदीचा अपमान हे कुरुक्षेत्र युद्धाचे सर्वात मोठे कारण ठरले.
 
शकुनी जुगार खेळत असलेले फासे त्याच्या मृत वडिलांच्या पाठीच्या कण्यातील होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर शकुनीने त्यांच्या काही अस्थी स्वतःकडे ठेवल्या. असेही म्हटले जाते की शकुनीच्या वडिलांचा आत्मा त्याच्या फास्यात वास करत होता, त्यामुळे फासे फक्त शकुनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होते. असे म्हणतात की शकुनीच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी शकुनीला सांगितले होते की, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांपासून फासे बनवा, हे फासे नेहमी तुझी आज्ञा पाळतील, जुगारात तुला कोणीही हरवू शकणार नाही.
 
असंही म्हटलं जातं की शकुनीच्या फासात एक जिवंत भौंरा होता जो प्रत्येक वेळी येऊन शकुनीच्या पायावर पडत असे. म्हणून जेव्हा जेव्हा फासे पडत असे तेव्हा ते सहा संख्या दर्शवित होते. शकुनीलाही याची जाणीव होती, म्हणून तो फक्त सहा आकडा म्हणत असे. शकुनीचा सावत्र भाऊ मटकुनीला माहित होते की फासाच्या आत एक भोवरा आहे.