कसे तयार कराल होळीचे नैसर्गिक रंग
लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात कणीक मिळवू शकता. सिन्दुरियाच्या बिया लाल रंगाच्या असतात, यांना वाळवून कोरडा आणि ओला रंग बनवता येऊ शकतं.
* दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर यात वीस लीटर पाणी मिसळा. डाळिंबाची साले उकळून लाल रंग तयार केला जाऊ शकतो.
* बुरांसचे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून लाल रंग तयार होईल परंतू हे फूल पर्वतीय क्षेत्रात मिळतात.
* पलिता, मदार आणि पांग्री यावर लाल रंगाचे फुलं लागतात. हे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानं लाल रंग मिळेल.
* पलिता, मदार आणि पांग्री यावर लाल रंगाचे फुलं लागतात. हे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानं लाल रंग मिळेल.
* कोरड्या मेंदी पावडरने आपण हिरवा रंग तयार करू शकता. पण मेंदी कोरडी वापरवी. ओली केल्यास त्वचेवर लाल रंग राहून जाईल. केसांवर लावायला काही हरकत नाही.
* गुलमोहराचे पाने वाळवून, त्याची पावडर तयार करून हिरव्या रंगाच्या रूपात वापरू शकतात.
* दोन चमचे मेंदीत एक लीटर पाणी मिसळा. पालक, कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट तयार करून त्याचा घोळ तयार करून हिरवा रंग तयार करू शकता.
* बीट किसून घ्या आणि त्यात एक लीटर पाणी मिसळा. गुलाबी रंग तयार होऊन जाईल.
* पलाशचे फुलं रात्र भरासाठी पाण्यात भिजवून ठेवल्यास केशरी रंग तयार होईल. श्रीकृष्ण या फुलांनी होळी खेळायचे असे मानले जाते. तसेच हरसिंगारच्या फुलांना भिजवूनदेखील रंग तयार केला जाऊ शकतो. किंवा चिमूटभर चंदन पावडर एक लीटर पाण्यात टाकल्याने केशरी रंग मिळतो.
* दोन चमचे हळद पावडर घेऊन त्यात बेसन मिसळा. बेसनाऐवजी कणीक किंवा टॅल्कम पावडरही मिसळू शकता. हे त्वचेसाठी उत्तम ठरेल.