शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (13:15 IST)

'स्पायडर-मॅन' उंच झेप घेत 100 कोटी क्लबमध्ये सामील

स्पायडर-मॅन: नो वे होम' ख्रिसमसच्या आधी भारतासह संपूर्ण जगात धुमाकूळ घालत  आहे. चित्रपटाचे पहिले 3 दिवस ज्या प्रकारे कलेक्शन होते, त्यानंतर रविवारी चित्रपटगृहात पोहोचणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली. शनिवारच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. देशभरातील मल्टिप्लेक्समध्ये याने चांगली कामगिरी केली आहे. याला दक्षिण तसेच हिंदी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपटही याच आठवड्यात प्रदर्शित झाला आहे, पण त्याचा 'स्पायडर-मॅन'वर फारसा फरक पडलेला दिसत नाही.
 
'स्पायडर मॅन'नो वे होमने गुरुवारी 32.67 कोटी, शुक्रवारी 20.37 कोटी आणि शनिवारी 26 कोटींची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. रविवारी या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली आहे. हा सुरुवातीचा आकडा आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने 4 दिवसांत 109 कोटींची कमाई केली असून कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे