गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (09:11 IST)

न्यूझीलंडच्या मशीदीत झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, थोडक्यात बचावली बांगलादेशाची टीम

न्यूझीलंडच्या एका मशीदीत शुक्रवारी सकाळी झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे जेव्हा की बरेच लोक जखमी झाले आहे. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. असे हे सांगण्यात येत आहे की बांगलादेशाची टीम थोडक्यात बचावली.  
 
न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सेंट्रल क्राइस्टर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशीदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसऱ्या मशीदीला रिकामी करण्यात आलं आहे.
 
बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू तमीम इक्बालाने ट्विट करून सांगितले की, 'गोळीबारात पूर्ण टीम थोडक्यात बचावली. फारच भीतिदायक अनुभव होता.' सांगण्यात येत आहे की घटनेच्या वेळेस बांगलादेशाचे खेळाडू मशीदीतून बाहेर पडण्यास यशस्वी झाले. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशाच्या संघाला शनिवारी क्राइस्टचर्चमध्ये सामना खेळायचा आहे.