रॅगिग रोखण्यासाठी 'अँटी रॅगिग मोबाईल ऍप'
रॅगिग विरोधात तक्रार करण्यासाठी विद्यापीठ आयोगाने अँटी रॅगिग मोबाईल ऍप तयार केले आहे. या ऍपचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लॉंचिंग करण्यात आले.
नवीन विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे गुन्हा आहे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यासाठी पीडित विद्यार्थ्यांनी ऍपची मदत घेवून तक्रार नोंदवावी, असे जावडेकर यांनी सांगितले आहे. याचे मुळापासून उच्चाटन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.