शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

'प्यूमा'चे भारतात पहिले स्मार्टवॉच लॉन्च

'प्यूमा'ने भारतात पहिलं स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या स्मार्टवॉचची किंमत १९,९९५ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच संपूर्ण भारतात प्यूमा स्टोर्समध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टवॉच ऑनलाईन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि Puma.comवरही उपलब्ध असणार आहे. कंपनीकडून 'प्यूमा' स्मार्टवॉचवर २ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.
 
प्यूमा स्मार्टवॉच, गुगल फिटद्वारे वर्कआऊट रोइंग, स्पिनिंग, पायलेट्स, काउंट रिप्स यांसारख्या ऍक्टिव्हीटीही ट्रॅक करतो. स्मार्टवॉचला वर्कआऊट मोटवर सेट केल्यानंतर ते सतत हृदयाचे ठोकेही ट्रॅक करतं. हे स्मार्टवॉच एक ओएस (OS)डिवाइस आहे. त्यामुळे गुगल असिस्टेंट यात इन-बिल्ट आहे. स्मार्टवॉच स्विम प्रुफ असून आणि गुगल पेच्या माध्यमातून यात पैसेही पाठवले जाऊ शकतात. प्यूमा स्मार्टफोनची बॅटरी १ ते २ दिवसांपर्यंत चालणार आहे.
 
स्मार्टवॉचमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ३१०० देण्यात आलं आहे. स्मार्टवॉचला १.१९ इंची  AMOLED डिस्प्ले असून ३९०x३९० पिक्सल रिझॉल्यूशन सपोर्ट देण्यात आलाय. प्यूमा स्मार्टवॉचमध्ये ५१२MB रॅम आणि ४GB इंटरनल स्टोरेज आहे. या वॉचमध्ये ऍल्यूमिनियम डायलसह सिलिकॉन बेल्ट देण्यात आला आहे. Puma smartwatch मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ४.२, GPS ही आहे.