शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:19 IST)

आपचा जाहीरनामा, नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

आगमी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा (आप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आगामी काळात दिल्लीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. सध्याच्या घडीला दिल्लीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्याबाहेरून आलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीतून शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. 
 
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे म्हटले. भारताने आजपर्यंत अनेक हल्ले सहन केले. मात्र, आता भारताच्या एकतेवरच प्रहार केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही एकट्यादुकट्या पक्षाची राहिलेली नाही. मोदी-शहा यांनी सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.