मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 27 एप्रिल 2019 (11:18 IST)

गायक दलेर मेहंदी यांचा भाजपात प्रवेश

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी भाजपत प्रेश केला आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षबर्धन यांच्या उपस्थितीत मेहंदी यांनी भाजपत प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच पंजाबी गायक हंसराज हंस यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूर रिंगणात उतरवले आहे. तसेच अभिनेता सनी देओलनेही भाजपत प्रवेश केला असून त्याला गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता दलेर मेंहदी यांनी भाजपत प्रवेश केल्याने त्यांना पंजाबमधील एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दलेर मेहंदी यांचा ‘बोलो ता रा रा’ हा पहिला अल्बम 1995 मध्ये आला होता. या अल्बमने त्यांना जगभरात ओळख मिळाली. त्यानंतर 1998 मध्ये ‘तुनक तुनक’ हा अल्बमही लोकप्रिय झाला होता.