सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (16:49 IST)

तावडे यांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खोचक टीका केली आहे. पवारांना बारामतीमध्ये पराभव दिसू लागला आहे, अशी टीका तावडे यांनी पवारांच्या ईव्हीएमच्या वक्तव्यावर केली. 
 
पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये बारामतीमध्ये भाजपचा विजय झाल्यास निवडणुकांवरील विश्वास उडेल असे धक्कादायक वक्तव्य केले होते. मुलाखती दरम्यान बारामतीबाबत पवारांच्या दाव्यावर भाजपला काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता तावडे म्हणाले, पवार यांनी व्यक्त केलेल्या शंकेवरून असे वाटते की, पवारांना बारामतीचा कौल दिसत आहे. त्यांची देहबोली आणि त्यांच्या वक्तव्यावरून पराभव स्पष्ट दिसत आहे.