1 तासाभरात ही थाळी संपवा, नवी बुलेट जिंका

bullet thali pune Maharashtra
Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:40 IST)
याला खवय्यांसाठी एक सुवर्णसंधी असेच म्हणावे लागणार आणि त्यातून जर आपल्याला रॉयल एन्फिल्ड बुलेटची आवड असेल तर मग नक्कीच हे चॅलेज आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.
पुण्यातील एका रेस्टॉरंटने एक थाळी एक तासभरात संपल्यावर चक्क बुलेट जिंकण्याची ऑफर दिली आहे. वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर दिली आहे.

हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलबाहेर ५ नव्या बुलेटही उभ्या केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट ‍जिंकण्यासाठी आपल्याला भव्य थाळी तासभरात फस्त करावी लागेल. बुलेट थाळीची किंमत ४ हजार ४४४ रुपये इतकी आहे. या ऑफरमुळे हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
आतापर्यंत सोलापूर रहिवासी सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत फस्त केली.

यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.

काय आहे बुलेट थाळी डबल चॅलेंज
या थाळीत तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि मासे वापरले जातात. 55 जण ही थाळी तयार करतात.
बुलेट थाळी मध्ये पापलेट, सुरमई, चिकन लेग पीस, कोलंबी करी, मटन मसाला, चिकन फ्राय, कोळंबी बिर्याणी, भाकरी, रोटी, सुकट, कोलंबी कोळीवडा, रायता, सोलकडी, रोस्टेड पापड, मटण अळणी सूप एवढे पदार्थ देण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ करण्याचे टिप्स जाणून घ्या. लॅपटॉपचा सतत वापर केल्याने कीबोर्डवर घाण ...

मुंबई बत्तीगुल प्रकरणाच्या चौकशीत आढळल्या या 6 धक्कादायक ...

मुंबई बत्तीगुल प्रकरणाच्या चौकशीत आढळल्या या 6 धक्कादायक गोष्टी
मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेमागे घातपाताची शक्यता असू शकते,

मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला? राज्य आणि केंद्र ...

मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला? राज्य आणि केंद्र आमने-सामने
चीनने सायबर हल्ला केल्याने मुंबईत बत्तीगुल झाली होती का? हा मुद्दा ठाकरे सरकार आणि मोदी ...

राहुल गांधी: 'आणीबाणी लागू करण्याचा आजीचा निर्णय चुकीचा'

राहुल गांधी: 'आणीबाणी लागू करण्याचा आजीचा निर्णय चुकीचा'
आणीबाणी लागू करण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निर्णय चुकीचा होता असं राहुल ...

चीन सायबर हल्ला कसा करतं? आणि भारत तो कसा टाळू शकतो?

चीन सायबर हल्ला कसा करतं? आणि भारत तो कसा टाळू शकतो?
गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान प्रांतात संघर्ष झाला होता. यानंतर चारच ...