Covid Umbrella : पाऊस आणि कोरोना दोघांपासूनही वाचवणारा
सध्या कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभरात थैमान घालतो आहे. त्यापासून वाचण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हातांची स्वच्छता महत्त्वाची आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञ विविध उपकरणंही तयार करत आहेत, तर सर्वसामान्य लोकंही काही ना काही जुगाड करताना दिसत आहेत आणि आता अशातच कोविड अम्ब्रेलाचा (covid umbrella protect from corona and rain) व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
आधीच कोरोना त्यात आता पाऊस मग या दोघांपासून वाचण्यासाठी ही अनोखी छत्री. या विशेष कोरोना अम्ब्रेलाचा व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी ट्विट केला आहे. ज्याला त्यांनी कोविड अम्ब्रेला असं कॅप्शनही दिलं आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागला आहे.
या व्हिडीओत आपण पाहू शकतो एक व्यक्ती छत्री घेऊन चालत असते. त्याच्या समोरून एक महिला येते आणि जोरात शिंकते. ती शिंकत असल्याचं दिसताच तिंची शिंक बाहेर येण्याआधीच छत्री घेतलेली व्यक्ती झटापटीने आपली छत्री खोलते आणि त्या छत्रीवरील एक प्लास्टिक शीट खाली येतं, जे त्या व्यक्तीला चहूबाजूंनी संरक्षण देतं.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्यात. बऱ्याच जणांना ही छत्री आवडू लागली आहे