ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

asha bhosale
मुंबई| Last Modified गुरूवार, 29 जुलै 2021 (21:17 IST)
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की राज्य शासनाचा 2021 सालचा 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशाताईंचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारकडून 1996मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तर दुसरा पुरस्कार 1997मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत.



यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा धोका

येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा धोका
रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. ...

ही बँक SBI, HDFC पेक्षा बचत खात्यावर जास्त व्याज देत आहे

ही बँक SBI, HDFC पेक्षा बचत खात्यावर जास्त व्याज देत आहे
बचत खात्यांवर व्याजदर कमी होत असताना देखील नवीन खाजगी बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), ...

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी असं दिल उत्तर

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी असं दिल उत्तर
मुंबईतल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न ...