शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (08:56 IST)

सोशल मीडियावर वेगळीच जुगलबंदी

‘बाहुबली : द कन्क्लुजन’ आणि हॉलिवूडचा ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई केली आहे. मात्र दोन चित्रपटांची सध्या सोशल मीडियावर वेगळीच जुगलबंदी पाहायला मिळतेय. चीनमध्ये एकाच आठवड्यात हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिथल्या प्रेक्षकांवर या चित्रपटांचा झालेला परिणाम सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. भारताचा ‘बाहुबली’ आणि हॉलिवूडच्या ‘अॅव्हेंजर्स’ना एकत्र आणत तयार केलेले भन्नाट मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
 

मार्व्हल युनिवर्स आणि माहिष्मती साम्राज्य या दोघांचा हटके मॅश-अप या मीम्समधून पाहायला मिळत आहे. ‘व्ही चॅट’ हा चीनमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया अॅप आहे आणि या अॅपवरच हे मीम्स सर्वाधिक व्हायरल होत आहेत.