शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

अडवाणींनी भरला उमेदवारी अर्ज

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरात मधून आज आपला उमेदवारी अर्ज भरला. गुजरातच्या गांधीनगरमधून ते निवडणुक लढवत असून, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी हा अर्ज दाखल केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला यांच्या घरी त्यांनी पुजा केल्यानंतर अडवाणींनी आपल्या कुटूंबासमवेत गांधीनगर येथील जिल्हाधीकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

अडवाणींनी आतापर्यंत या जागेवर चारदा विजय मिळवला असून, यावर्षीही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.