ओळखपत्र काढताना बिप्स वैतागली
बोल्ड गर्ल म्हणून परिचीत असलेल्या बिपाशा बसुला निवडणुक ओळखपत्र काढताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागल्याने ती जाम वैतागली आहे. एका मोग्झीनच्या प्रदर्शनानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत तिने आपल्याला कराव्या लागलेल्या कसरतींचा पाढा वाचला. निवडणुक म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो, परंतु निवडणुकीत मतदान करणे आपल्याला आपवडत असल्याचे ती म्हणते. मतदान हा एकच चान्स असा असतो की आपण ज्यात देशाचा नेता निवडू शकतो आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मत देऊ शकोत असे तिचे म्हणणे आहे. निवडणुक ओळखपत्र तयार करताना आपल्याला असंख्य अडचणी आल्याने या प्रक्रियेत काही बदल करण्याची गरज तिने व्यक्त केली आहे. जॉन अब्राहम हा आपला चांगला मित्र असला तरी त्याच्याशी लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे ती म्हणाली.