Last Modified: आलाप्पुझा , बुधवार, 8 एप्रिल 2009 (22:54 IST)
पवार तिसर्या आघाडीत येणार:करात
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिसर्या आघाडीसोबत येण्यास तयार आहेत, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी केला आहे.
श्री. करात यांनी सांगितले की, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यासारख्या नेत्यांनी कॉंग्रेसशी नाते तोडले आहे. आता शरद पवार तिसर्या आघाडीशी हातमिळवणीस तयार आहे. यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडक्ष केंद्रात सरकार कसे बनविणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.