शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|
Last Modified: वाटाकारा (केरळ) , बुधवार, 8 एप्रिल 2009 (16:19 IST)

भाजप- डाव्यांवर सोनियांचा प्रहार

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात प्रचार करणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि डाव्या आघाडीतील पक्षांवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जोरदार प्रहार केला.

केरळमध्ये कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या आल्या असता त्यांनी भाजप आणि डाव्यांना संधीसाधू ही उपमा दिली. पंतप्रधान मनमोहन यांचा विरोध करण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आलेत ही शरमेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्या विरोधात अपमानजनक भाषण करणे चुकीचे असल्याचे सोनिया म्हणाल्या. मनमोहन यांनी भारताच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केल्याची पावतीही त्यांनी दिली.