शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|
Last Modified: मुरादाबाद , बुधवार, 8 एप्रिल 2009 (20:29 IST)

मॅच फिक्सिंगचा मुद्दा उपयोगाचा नाही: अझर

मॅच फिक्‍सिंगप्रकरणी आपल्यावर झालेले आरोप हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि कॉंग्रेस उमेदवार मोहंमद अझरुद्दिन यांनी विरोधकांच्या प्रयत्नांवर टीका केली.

अझहरुद्दीन यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मॅच फिक्सिंगचा मुद्दा प्रचारात मांडणार असल्याचे भाजपासह इतर विरोधी पक्षांनी जाहीर केले. त्याबाबत अझर म्हणाला की, मॅच फिक्सिंग मुद्‌द्‌याचा विरोधकांना उपयोग होणार नाही. क्रिकेटमधील आपली कारकीर्द लोकांपर्यंत पोचण्यास आपल्याला मदत करेल. तसेच आयात केलेला उमेदवार असा शिक्का आपल्यावर मारण्यानेही काहीच फरक पडणार नाही.