शेखावत करणार फर्नांडिसांचा प्रचार
जनता दलाच्या आपल्याच लोकांनी 'साथी' जॉर्ज फर्नांडिसांची 'साथ' सोडली असली तरी त्यांचे संघीय साथी व माजी राष्ट्रपती भैरोसिंह शेखावत मात्र अजूनही त्यांच्या साथीस आहेत. बंडखोरी करून अपक्ष म्हणून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या फर्नांडिसांच्या प्रचारासाठी शेखावत बिहारमध्ये जाणार आहेत. शेखावत दहा एप्रिलला मुजफ्फरपूर येथील दोन सभांना उपस्थित रहातील. फर्नांडिस यांना वय झाल्यामुळे पक्षाने तिकिट नाकारले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी बडखोरी करून अर्ज भरला आहे. फर्नांडिस नऊ वेळा खासदार झाले आहेत. ते शेखावत यांचे जुने मित्र आहेत. जनता दलाने फर्नांडिस यांच्याविरोधात कॅप्टन जयनारायण निषाद यांना उमेदवारी दिली आहे.