शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

अडवाणींनाही नाही विजयाची शाश्वती?

एनडीएला बहुमत मिळेल असे मला वाटत नाही असे वक्तव्य करून भाजपच्या विजयी अभियानातील हवा पक्षाच्याच नेत्या सुषमा स्वराज यांनी काढली होती. आता पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनीही असेच काहीसे वक्तव्य करून कार्यकर्त्यांमधला जोष कमी केला आहे.

अडवाणी यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रात्री पार्टीही दिली. यात मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर बोट ठेवत. कार्यकर्त्यांमध्ये

2004च्या निवडणुकांप्रमाणेच अतिआत्मविश्वास दिसून येत असून, त्यांनी थोडे धीराने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांसह नेतेही आवाक झाले.

2004च्या निवडणुकांच्या पराभवाचे मोठे कारण भाजप कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास हेच होते असे सांगताना आताही कार्यकर्त्यांमध्ये मला हा दिसून येत असल्याने त्यांनी सावधगिरी बाळगावी असा सल्लाही अडवाणींनी कार्यकर्त्यांना दिला.