अब्दुल्ला कुट्टी यांच्या कारवर दगडफेक
माकपतून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार ए पी अब्दुल्ला कुट्टी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. पोलिस आधीकारी एम बी आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालड भागात आली असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. एका निवडणुक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर हा हल्ला करण्यात आला.