आसाममध्ये निवडणुक पर्यवेक्षकावर हल्ला
मध्य आसामातील नॉर्थ कछार हिल्स जिल्ह्यात आज सकाळी अज्ञात नक्षलवाद्यांनी निवडणुक आयोगाच्या पर्यवेक्षकावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यवेक्षक ए पी सिंह त्यांच्या टीम सोबत जात असताना नक्षलवाद्यांनी टीमवर अचानक अंदाधूंद गोळीबार सुरु केला. हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून, पोलिसांनी या भागात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.