कॉग्रेस उमेदवाराचा 'आयपीएल' प्रचार
मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उमेदवार आणि पक्ष विविध युक्त्या लढवत आहेत. एका कॉग्रेस उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी आयपीएल सामन्यांचा आधार घेतला असून, त्याने आपल्या वेबसाइटवर आयपीएल स्कोर देण्याची व्यवस्था केली आहे. आयपीएल सामन्यांना आफ्रिकेत सुरुवात होणार असून, या दरम्यान निवडणुका असल्याने मतदारांना आकर्षीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कॉग्रेस उमेदवार महाबळ मिश्रा यांनी दिली आहे. इंडियन प्रिमीयर लिगच्या सामन्यांचा स्कोरही यावर देण्यात येणार आहे.