शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

देवेगौडा कोट्यधीश तर बंगाराप्पा लक्ष्मीपती

जनता दल सेक्युलर प्रमुख एच डी देवेगौडा यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस बंगाराप्पा यांनीही आपला अर्ज दाखल केला असून, उभय नेत्यांनी यात आपली संपत्ती जाहीर केली आहे.

माजी पंतप्रधान आणि एका पक्षाचे प्रमुख असलेल्या देवेगौडांकडे 2.92 कोटीची मालमत्ता असून, या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नसल्याचे त्यांनी म्हटले आहेत तर बंगाराप्पा यांनी आपल्याकडे केवळ 15 लाख रुपयांची नगदी आणि जमीन असल्याचे आपल्या अर्जात नमूद केले आहे.