शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

'पंतप्रधानांबद्दल आदर, पण अमेरिकन प्रेमाला आक्षेप'

पंतप्रधान डॉ.‍मनमोहनसिंग यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला तसूभरही शंका नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. परंतु त्यांच्या अमेरिकन प्रेमाला आमचा आक्षेप आहे, असे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी सांगितले.

एनडीटीव्हीशी बोलतांना श्री.भट्टाचार्य यांनी सांगितले की, डॉ.मनमोहनसिंग यांची मी आदर करतो. कारण ते सत्यवादी आणि विद्वान अर्थतज्ज्ञ आहे. मी त्यांचा धोरणांचा विरोध करतो. विशेषता: त्यांच्या अमेरिकन प्रेमाला विरोध करतो.

नंदीग्राममध्ये झालेल्या हिसांचाराची आम्ही जाबाबदारी टाळत नसल्याचे त्यांनी सांगितले.