मी निवडणुक लढवणारच-टायटलर
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर यांनी काहीही झाले तरी आपण निवडणुक लढवणारच अल्याचे स्पष्ट करत आता कॉंग्रेसला आव्हाण दिले आहे. 1984
साली दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणात टायटलर दोषी असून, आता न्यायालयात सीबीआयने त्यांच्याविरोधातील केस मागे घेत त्यांना निर्दोष असल्याचे म्हटले आहे. सीबीआयच्या या भूमिकेनंतर शीख समुदायात नाराजगी असून, टायटलर यांना तिकिट न देण्यासाठी कॉंग्रेसवर दबाव वाढत आहे. कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी दिलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, काहीही झाले तरी आपल्याला पक्षाकडून तिकिट मिळेल आणि आपण उत्तर दिल्लीतून निवडणुक लढवणार असल्याचे टायटलर यांनी ठासून सांगितले आहे.