वायको विरुधूनगरमधून निवडणुक लढवणार
लिट्टे प्रमुख प्रभाकरण याच्या समर्थनार्थ वक्तव्य करणारे वायको तमिळनाडूतील विरुधूनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. अन्नाद्रमुकशी युती केल्यानंतर जागा वाटपाचा तिढा संपुष्टात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रभाकरण याच्या केसालाही धक्का लागला तर तमिळनाडूत रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी त्यांनी एका जाहीर प्रचारसभेतून दिली आहे. श्रीलंकेतील तमिळ नागरिकांवर सरकारचा अत्याचार सुरू असून, हाच मुख्य मुद्दा करत त्यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे.