शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

विठोबाची आरती

vitthal
पावला प्रसाद आता विठो निजावे | आता विठो निजावे ||
आपुला तो श्रम कळो येतसे भावे || १ ||
 
आता स्वामी सुख निद्रा करा गोपाळा | निद्रा करा गोपाळा ||
पुरले मनोरथ, जातो आपुल्या स्थळा ||२||
 
तुम्हांसी आम्ही जागविले आपुलिया काजा | स्वामी आपुलिया काजा ||
शुभा शुभ कर्म दोष हरवया माझा || ३||
 
तुका म्हणे दिधले उच्छिष्टांचे भोजन | उच्छिश्टांचे भोजन ||
नाही निवडले आम्हा आपुलिया भिन्न ||४||