रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (08:00 IST)

सौंदर्य टिप्स:ओठांवरील काळपटपणा दूर करण्यासाठी टिप्स जाणून घ्या

ओठ आपल्या चेहर्याचे सौंदर्य दुप्पट करतात. विशेषतः जेव्हा ते नैसर्गिक गुलाबी असते.परंतु कधीकधी शरीरात पोषण नसल्यामुळे ओठ काळे होतात.काळजी घेतली नाही तर ते हळूहळू काळपट होऊ लागतात.काळे ओठ नैसर्गिक कसे ठेवावे आणि कोणते उपाय करून ओठांचा काळपटपणा दूर करू शकतो जाणून घेऊ या 
 
1 डिहायड्रेशनचा अभाव- शरीरात पाण्याअभावी ओठ काळे होऊ लागतात. तर भरपूर पाणी प्या. आपल्याला तहान लागलेली नसली तरी पाणी प्या. लक्षात ठेवा नेहमी बसून पाणी प्या.
 
 
2 धूम्रपान करणे - ओठ काळपट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात धूम्रपान करणे. त्यात असलेल्या निकोटीन मुळे थेट आपल्या मऊ ओठांवर परिणाम होतो.
 
 
3 शरीरातील  कमतरता- जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी -12,व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा त्वचे बरोबरच ओठ काळे होण्याचा त्रास  होऊ लागतो.
 
 
4 कॅफिन- जे लोक चहा पीत नाहीत त्यांना कॉफी पिण्याची आवड असते.पण आपल्याला हे माहिती आहे का की कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे दात पिवळसर होऊ लागतात.
 
 
ओठांचा काळपटपणा कसा घालवायचा -
 
 
ओठांचा काळेपणा लपविण्यासाठी आम्ही बर्‍याच वेळा लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस वापरतो. परंतु असं पुन्हा पुन्हा करणे शक्य नाही. कारण थोड्या वेळाने हे निघून जाते.म्हणूनच आपण असे काही नैसर्गिक उपाय बद्दल जाणून घेऊ या.ज्याद्वारे ओठांची चमक कायम राखता येते.
 
1 रात्री ओठांना स्वच्छ केल्यावर गुलाबपाणी लावून झोपावे.असं दररोज करा आपल्याला काहीच दिवसात फरक दिसेल.
 
2 आपण रात्री बीटाचा रस लावून झोपू शकता.असं केल्याने आपले ओठ हळूहळू गुलाबी होतील.
 
3 ओठांवर लिंबू आणि साखर मिसळून स्क्रब लावू शकता असं केल्याने आपल्या ओठांवरील मृत पेशी निघून जातील.
 
4 दररोज अंघोळ केल्यावर ओठांना हळुवार हाताने चोळा. असं केल्याने ओठांवरील मृत त्वचा निघून जाईल.