स्पर्शाने रोगमुक्त करणारा ब्रह्मगुरू

WDWD
लोकांची श्रद्धा कधीकधी आपली सीमा ओलांडून अनेकदा इतकी पुढे जाते की आपण अंधश्रद्धेच्या प्रांतात आलोय हे त्यांना कळतही नाही. त्यामुळेच अनेक भाकड वाटणार्‍या कथांवरही विश्वास ठेवला जातो. कोणत्याही व्याधी किवा रोगावर उपचार करायचा झाल्यास त्यास औषधाशिवाय पर्याय नाही. पण केवळ बोटांच्या स्पर्शाने रोग बरे करण्याचा दावा करणार्‍या व्यक्तीकडे उपचारासाठी रांगा लागतात हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही खरी बाब आहे.

ब्रह्मज्ञानाच्या आध्यात्मिक शक्तीवर आधारीत ही उपचार प्रणाली आहे. त्यासाठी आम्ही आपला मोर्चा केरळकडे वळवला. निसर्गसुंदर अशा या केरळमध्ये आचार्य एमडी रवी मास्तर हे 'ब्रह्म गुरू' आम्हाला भेटले. हे गुरू रोगांवर आपल्या कोमल स्पर्शाने उपचार करतात. विशेष म्हणजे त्यांचे उपचार नि:शुल्क आहेत. एमडी रवी मास्तर कुणी डॉक्टर नाहीत. व्यवसायाने ते शिंपी आहेत. त्यांचे शिक्षणही यथातथाच झाले आहे. पण तरीही ते उपचार करतात. अगदी असाध्य रोगांवरही

त्यांना पुनर्जन्मातून रोगांवर उपचार करण्याची विद्या प्राप्त
WDWD
झाली आहे. या शक्तींचे ज्ञान झाल्यावर सामान्य व्यक्तीसही महान योगीपद प्राप्त होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे उपचार केंद्र ब्रह्म धर्मालय नावाचे प्रसिद्ध आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील चंगनास्सेरी येथे त्यांचे हे धर्मालय आहे. थिरूवनंतपुरम येथून हे ठिकाण साधारणत: 135 किलोमीटर तर कोच्चीहून 87 किलोमीटरवर आहे. आपल्या प्रार्थनेवेळी कोणत्याही देवी-देवतांशी आपण संवाद साधू शकत असल्याचा दावा रवी मास्तर करतात.


मात्र, आपण परमेश्वर किवा त्यांचा अवतार नसल्याचीही त्यांना खा‍त्री आहे. त्यांच्या मते लोकांच्या सेवेसाठी त्यांना ही शक्ती प्राप्त झाली आहे. कोणत्याही औषधाशिवाय ब्रह्मज्ञानाच्या आधारे ते उपचार करू शकतात.

WDWD
कोणत्याही रोगाचा उपचार आपण कोमल स्पर्शाने करतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या हातातून निघणारी ब्रह्मशक्ती रोगांवर परिणामकारक असल्याचा त्यांचा दावा आहे. 'सोरायसिस' सारख्या चर्मरोगावर औषध शोधण्यात आतापर्यंत कुणास यश आले नाही पण रवी मास्तराकंडेही त्याचा उपाय आहे. त्यांच्या ब्रह्म चिकित्सा केंद्रात अनेका मानसिक व शारीरीक व्याधींनी ग्रस्त लोक उपचारासाठी येतात.

शशिमोहन|
फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा....


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

देवी दुर्गे.... भवानी

देवी दुर्गे.... भवानी
गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, जाणून घ्या रोचक कथा
केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीरामाला गंगेच्या पलीकडे सोडले होते. केवट यांनी प्रथम ...

हनुमान जयंती विशेष, जाणून घ्या मारुतीला हनुमान का म्हणतात

हनुमान जयंती विशेष, जाणून घ्या मारुतीला हनुमान का म्हणतात
दर वर्षी चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळीस हनुमान जयंती साजरी केली जाते. हा हिंदूंचा ...

सप्तर्षी कोण आहे जाणून घेऊ या...

सप्तर्षी कोण आहे जाणून घेऊ या...
आज पर्यंत आपण सप्त ऋषींचे नावच ऐकत आलो आहोत. आज आपण त्यांचा बद्दलची माहिती जाणून घेऊ या.. ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...