1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , गुरूवार, 21 मे 2015 (11:53 IST)

अमिताभ, अभिषेक बच्चनने सिंगापुराच्या एका कंपनीत केले गुंतवणूक

बालीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनने संयुक्त रुपेण सिंगापुराच्या मेरिडियन टेकपीटीई लि. कंपनीत 2,50,000 डॉलर (किमान 1.6 कोटी रुपये)चे निवेश केले आहे. कंपनी फोकट क्लाउड स्टोरेज, ई-वितरण आणि सूक्ष्म-भुगतान प्लेटफार्म जिद्दू डॉट कॉमचे परिचालन करते.   
 
मेरेडियन टेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी वेंकट श्रीनिवास मीनावल्ली यांनी सांगितले की येणार्‍या दिवसांत दोन्ही बच्चन अधिक राशीची गुंतवणूक करू शकतात.  
 
मीनावल्लीने म्हटले, 'त्यांना कंपनीत थोडी भागीदारी मिळेल. उदारीकृत प्रेषण योजना (एलआरएस)च्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे नियम उदार असल्यामुळे ते अधिक गुंतवणूक करू शकतात.' नुकतेच रिझर्व्ह बँकेने वार्षिक विदेशी गुंतवणूक सीमा 2,50,000 डॉलर प्रति व्यक्ती केला होता.