शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भीका शर्मा|

इटलीच्या 16 लाखच्या बाइक्स भारतात

बाइक रायडर्ससाठी वर्ष 2014 फारच आनंदात जाणार आहे. आतापर्यंत देशात इटलीत तयार झालेल्या मोटारकार बघण्यात येत आहे पण आता प्रथमच इटालियन बाइकमॅकर मोटो मोरिनीने येणार्‍या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये आपल्या दोन पावरफुल बाइक्स लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

PR


सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार मुंबई स्थित कस्टम बाइक तयार करणारे एक फर्म 'वर्देची'ने मोटो मोरिनीसोबत भारतात इटलीच्या बाइकची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाईक्सला भारतात तयार न करता सरळ इटलीहून आयात करण्यात येतील आणि नंतर भारतात याचे वितरण प्रक्रिया मॅनेज करण्यात येईल.

मोटो मोरिनी ज्या दोन बाईक्सला लाँच करू शकतो त्यात पहिली बाइक आहे ग्रेनपासो 1200 आणि दुसरी आहे स्क्रँम्बलर. ग्रेनपासो 1200मध्ये 1187 सीसीचे वी-ट्वीन ओव्हरस्कँअर इंजिन असेल आणि स्क्रँम्बलरला समान इंजिनासोबत ऑल टॅरेन बाइकच्या स्वरूपात डेव्हलप करण्यात आले आहे.

PR


मोटो मोरिनी स्क्रँम्बलरच्या पुढील व्हील्समध्ये मारजोकी अपसाईड डाउन फोर्क शॉक एब्जार्बर आणि मागील व्हील्ससाठी एडजस्टेबल शॉक एब्जार्बर असतील. ग्रेनपासोत फ्रंट शॉक एब्जार्बर मारजोकी अपसाईड डाउन फोर्क जेव्हाकी रियर मोनो शॉक एब्जार्बर आहे.

दोन्ही बाइक्सचे टेक्निकल डिटेल्स अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही आहे. दोन्ही बाइक्सचे लुक फारच अग्रेसीव आहे. हाईटच्या बाबतीत ग्रेनपासोची उंची स्क्रँम्बलरपेक्षा थोडी जास्त आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही बाईक्सला भारतीय परिस्थितीप्रमाणे डिझाइन करण्यात आल्या आहेत. या मॉडल्सची सुरुवाती किंमत किमान 16 लाख रुपये राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.