शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By नई दुनिया|

जेट आज पुन्हा उडणार

जेट व्यवस्थापन आणि पायलटां मधील वाद मिटण्याच्या मार्गावर असून, जेटचे पायलट आज पुन्हा कामावर येणार आहेत.

मागील तीन दिवसांपासून पायलटांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. यात 432 वर पायलट सहभागी झाल्याने जेटचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

उड्डाणांवर परिणाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत, तर जेटचे प्रवाशी आता इतर विमान कंपन्यांकडे वळल्याने या विमान कंपन्यांनी आपल्या तिकिट दरात वाढ करत नफा वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

व्यवस्थापन आणि नॅगच्या (नॅशनल एव्हिएशन गिल्ड) पदाधिकाऱ्यांमध्ये काल झालेल्या बैठकीत या वादावर तोडगा निघाला असून, आज पायलट पुन्हा कामावर रुजू होणार आहेत.