गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवीदिल्ली , सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (16:23 IST)

7th Pay Commission: केंद्र या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देईल, दरमहा पगार 15000 रुपयांनी वाढेल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देणार आहे. वास्तविक, या वेळी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासह काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची घोषणा करणार आहे. केंद्रसरकारच्या काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीची केलेली विनंती सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी आदेशानुसार 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
 
कोणाचा पगार किती असेल?
या पदोन्नतीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 25,350 रुपयांवरून 29,500 रुपये होईल. सरकारच्या आदेशानुसार, रेल्वे बोर्ड सचिवालय सेवा (RBSS), रेल्वे बोर्ड सचिवालय स्टेनोग्राफर सेवा(RBSSS) च्या अधिकाऱ्यांची पदोन्नती या वर्षी केली जाणार होती. या अधिकाऱ्यांना अवर सचिव/उपसचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदोन्नतीसह त्यांचे वेतन दरमहा सुमारे 15,000 रुपयांनी वाढेल. असे सांगितले जात आहे कीज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 67,700 रुपये आहे, त्यांचे वेतन दरमहा 78,800 रुपये होईल.
 
पदोन्नतीचे आदेश कधी जारी केले जातील?
मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता (डीए), परिवहन भत्ता, घरभाडे भत्ता (एचआरए) आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होईल. वेतन बँड श्रेणी III अंतर्गत येईल, जे 7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार आहे. केंद्र सरकारचा कार्मिक विभाग राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मंजुरी घेतल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आदेश जारी करेल. महत्वाचे म्हणजे की जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून28 टक्के आणि घरभाडे भत्ता 24 टके वरून 27 टक्के केला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढेल. यामुळे ते 31 टक्के होईल.