1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (15:13 IST)

गोव्यात आता बिअर महागणार, उत्पादन शुल्क विभागाने केली शुल्क वाढवण्याची घोषणा

beer
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आता तिथे बिअर पिण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. राज्य सरकारने बीअरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बिअर 30 रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. गोवा नेहमीच स्वस्त दारूसाठी ओळखला जातो. मात्र आता भाव वाढू शकतात. 
 
गोव्यात बिअर महागणार गोवा सरकारने बिअरवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० ते १२ रुपयांनी वाढ केल्याने राज्यात बिअर महाग होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दर  वाढ जाहीर केली. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात बिअर 15 ते 30 रुपयांपर्यंत महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
गोव्यात बिअरचे दर महागणार गोवा लिकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, या शुल्कवाढीनंतर लाईट बिअर 15 रुपये प्रति बाटली, स्ट्राँग बीअर 20-25 रुपये, तर महागडी बीअर 30 रुपये प्रति बाटली महागणार आहे.
 
गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, लाईट बिअरची किंमत 15 रुपयांनी वाढणार आहे. 
 
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा नेहमीच स्वस्त दारूसाठी ओळखला जातो. गोव्यात विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या तुलनेत मद्य स्वस्त दरात उपलब्ध आहे. बिअरच्या दरात वाढ झाल्यानंतर पर्यटकांना गोव्यात बिअर पिण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडे गोव्यात दारूच्या विक्रीत.30-40 टक्क्यांनी घट झाली आहे.  
 
Edited By - Priya Dixit