शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (16:03 IST)

Jaguar XE- 2-0 डिझेल कार आकर्षक किंमतीत इंडियात लॉन्च

जग्वारने भारतात आपली 2.0 लीटर डीझेल एक्सईला लॉन्च केले आहे. याची सुरुवातीची किंमत अर्थात बेस वेरिएंट प्योरची किंमत  38.25 लाख रुपये आहे. अद्याप कंपनीने याच्या मिड लेवल प्रेस्‍टीज व टॉप मॉडलच्या किमतीचा खुलासा केलेला नाही आहे. हे जग्वारचे या वर्षाचे सर्वात महत्त्वपूर्ण लाँच होते.  
 
या फोर सिलेंडर डीझेल मॉडलने आता त्या सेडानची कमी दूर केली आहे ज्यात लोकांना एक डीजल जगुआर हवी होती. जग्वारला ऑटो एक्सपो 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते त्या वेळेस देशातील सर्वात स्वस्त जग्वार बनली होती. पण हेच एक मॉडल होते ज्यात डिझेलाचा विकल्प उपस्थित नव्हता.  
 
यात जेएलआरचा 2.0 लीटर इगेनियम डीझेल इंजिन लागले आहे जे की 180 एचपीची शक्ती व 430 एनएमचा टॉर्क देतो. जर याचे  जर्मन प्रतिस्पर्धीशी तुलना केली तर एक्सई मर्सिडिज सी 220 डी हून 10 एचपीची जास्त शक्ती तथा बीएमडब्‍ल्यू 320 डी व ऑडी ए4 35 टीडीआय पेक्षा 10 एचपी कमी शक्ती देतो. याच्या डिझेल इंजिनमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स लागलेले आहे. याची बुकिंग यात महिन्यात सुरू होणार आहे. एक्सईला पुणे प्लांटमध्ये स्थानीय रित्या असेंबल करण्यात येते.